Join us

बाहुबली फेम गायक गायक दिव्या कुमारनं गायलं बाप्पाचं गाणं, "नाद नाद गणपती" प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:07 IST

Divya Kumar :दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत.

"चोरीचा मामला", "भेटली ती पुन्हा" तसेच आगामी "लव सुलभ" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर स्वरूप स्टुडिओज् आता स्वरूप म्युझिक या नव्याकोऱ्या युट्युब म्युझिक चॅनलद्वारे म्युझिक अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधत "नाद नाद गणपती..." या गाण्यानं म्युझिक चॅनलचा शुभारंभ होत असून, 'जी करदा'सारखी अनेक हिट गाणी गायलेला  गायक दिव्या कुमारनं हे गाणं गायलं आहे.

स्वरूप म्युझिकच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी "नाद नाद गणपती..." या गाण्याची निर्मिती केली आहे. विष्णु सकपाळ यांनी लिहिलेलं हे गाणं वरद-राजू या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग मॉन्टू गोसावी, राजू कुलकर्णी, वरद कुलकर्णी यांनी केले असून संगीत संयोजक रूपम भागवत आहेत. 

दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. बाहुबली फेम दिव्या कुमार यांचा  "नाद नाद गणपती.." हा पहिलाच मराठी म्युझिक अल्बम आहे. दिव्या कुमार यांनी काही मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली असली, हा त्यांचा पहिलाच मराठी म्युझिक अल्बम आहे. 

टॅग्स :बाहुबली