Join us

प्रेक्षकांमध्ये बसून चित्रपट पाहायला आधिक आवडतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 16:05 IST

जॉजी रेशल जॉब दिग्दर्शित पैसा पैसा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तरूणींची दिल की धडकन असलेला ...

जॉजी रेशल जॉब दिग्दर्शित पैसा पैसा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तरूणींची दिल की धडकन असलेला अभिनेता सचित पाटील याने प्रेक्षकांमध्ये बसून स्वत:चाच चित्रपट पाहण्याची मज्जाच काही और असते. कारण आपल्याला आपल्या चित्रपटाबद्दलच्या भावभावना प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या चेहºयावर पाहायला मिळते. तसेच पैसा पैसा चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी रसिक मायबापांचा एवढा प्रतिसाद देखील खूप छान मिळत असल्याचे सचितने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.  सचित म्हणाला, ज्यावेळी चाहते स्वत:च येवून प्रत्यक्ष भेटून कमेन्ट करतात की, खूप छान चित्रपट होता. तुझी आणि स्पृहाची जोडी रूपेरी पडदयावर अधिक सुंदर दिसते. तुम्ही एकत्रित आणखी चित्रपट करा. त्यांच्या आशा अनेक प्रतिसादांनी खरचं कामाचे फलित झाल्यासारखे वाटते.sachit patil