Join us

आर्चीला पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 13:30 IST

सैराट या चित्रपटामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी बीडकरांची अक्षरश: ...

सैराट या चित्रपटामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी बीडकरांची अक्षरश: झुंबड उडाली होती. रिलायन्स आणि नगर पालिकेच्या मोफत वाय-फायचे उदघाटन करण्यासाठी आलेल्या रिंकूनं बीडकरांना अक्षरश: याड लावलं. यावेळी हजारो तरुणांची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.बीड नगरपरिषद आणि रिलायन्सच्या वतीने जिओ वाय-फाय सेवेचे उदघाटन करण्यात आले. यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू उर्फ आर्ची हिच प्रमुख आकर्षण होती. साधारणपणे 11 वाजताच्या कार्यक्रमासाठी बीडकरांनी सकाळी 9 वाजेपासून तुफान गर्दी केली होती. तरुण मुलं, मुली आणि महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या वेळी तरुणांनी बेधुंद होत सैराटच्या झिंगाट गाण्यावर डान्स केला.