Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत दामले बनणार ज्योतिषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 11:17 IST

प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी भविष्य पाहाण्याची खूप इच्छा असते. अशा वेळी हे लोक ज्योतिषीच्या ...

प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी भविष्य पाहाण्याची खूप इच्छा असते. अशा वेळी हे लोक ज्योतिषीच्या शोधात असतात. असेच काहीसे गं सहाजणी या मालिकेतील पैसा हातात टिकत नाही म्हणून त्रासलेले एम.यू. पी. बी. बँकेचे  मॅनेजर धबडगावकर हे ज्योतिषीच्या शोधात असतात. अशावेळी त्यांना ज्योतिषी म्हणून त्यांच्या मदतीसाठी  प्रशांत दामले येतात. म्हणजेच आता, प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते प्रशांत दामले हे छोटया पडदयावर ज्योतिषीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ते ज्योतिषशास्त्राच्या विशेष भागात रसिकांसमोर येणार आहेत. या भागात ते ज्योतिष विद्येत पारंगत असणारे प्रशांत दामले धबडगावकरांच्या शंकेचे निरसन करतात, पण त्यासोबतच सहाजणीमधील कामिनीच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे अचूक निदान करत सर्वांना अचंबित करतात. अशावेळी बँकेतील सर्वजण आपापले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे धावतात. वर्तमानाचा विसर पडून माणसे भविष्य जाणून घेण्यास किती आगतिक होतात हे या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या विशेष भाग पाहण्याची उत्सुकता लागली असणार हे मात्र नक्की. यापूर्वी प्रशांत दामले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नाटक, मालिका आणि अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत. यामध्ये त्यांनी मुंबई पुणे मुंबई २, वेलकम जिंदगी, गोळा बेरीज, तू तिथे मी, यज्ञ, चल गंमत करू, वाजवा रे वाजवा असे अनेक सुपरहीट चित्रपट केले आहेत. तसेच त्यांचे कार्टी काळजात घुसली, मोरूची मावशी, नकळत दिसले सारे, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार असे अनेक नाटक प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरले आहे.