Join us  

बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 1:59 PM

फोटोत खास काय दिसतंय ओळखलंत का?

'अशी ही बनवाबनवी' सिनेमा म्हणलं की आपसूकच मराठी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरल हसू येतं. सिनेमातील कलाकारांचा अभिनय, ते लोकप्रिय डायलॉग्स ३५ वर्षांनी आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे आणि निवेदिता सराफ या कलाकारांनी सिनेमात अशी काही धम्माल आणली की आज ३५ वर्षांनी सुद्धा पुन्हा नव्याने सिनेमा पाहण्याची इच्छा होते. इतक्या वर्षांनी चित्रपटाची आठवण यायचं कारण म्हणजे अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी शेअर केलेला एक खास फोटो आणि त्यावर निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी केलेली कमेंट. 

'धनंजय माने इथेच राहतात का?', '70 रुपये वारले', 'हा माझा बायको पार्वती', 'लिंबू कलरची साडी' हे डायलॉग्स आठवत असतीलच. अश्विनी भावे यांनी सिनेमात घातलेली लिंबू कलरची साडी आणि अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत आजच्या भाषेत म्हणायचं तर केलेलं फ्लर्ट. तो सीन तुमच्याही डोळ्यासमोर आला असेलच. तर बनवाबनवीच्या चाहत्यांसाठी अश्विनी भावेंनी पोस्ट केलेला हा खास फोटो सरप्राईजच म्हणाला लागेल. 

अश्विनी भावे यांनी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची भूमिका असलेलं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी दोघांसोबत छान फोटोही काढला. दरम्यान अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो खूपच खास ठरला. कारण यामध्ये अशोक सराफ यांनी लिंबू कलरचा शर्ट घातलेला दिसत आहे. 

हा फोटो पाहून चाहतेच काय तर अभिनेत्री निवेदिता सराफही खूश झाल्या. निवेदिता सराफ यांनी कमेंटमध्ये लिहिलं, 'त्याने लिंबू कलरचा शर्ट घातलाय.' तर दुसरीकडे काही चाहते म्हणाले, 'अश्विनी मॅडम तुम्ही लिंबू कलरची साडी नेसायला हवी होती.' अशोक सराफ आणि अश्विनी भावेंचा हा फोटो चाहत्यांना पुन्हा 'बनवाबनवी' च्या आठवणीत घेऊन गेला आहे. 

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफअश्विनी भावेमराठी अभिनेता