Join us

'मराठी टायगर्स'मध्ये दिसणार आशिष विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:10 IST

बॉलिवूड कलाकाराने प्रादेशिक भाषेत काम केले की, ती मोठी बातमी असते. असचं काहीसं झालयं बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्यासोबत. ...

बॉलिवूड कलाकाराने प्रादेशिक भाषेत काम केले की, ती मोठी बातमी असते. असचं काहीसं झालयं बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्यासोबत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य करणार्‍या 'मराठी टायगर्स' या चित्रपटात आशिष यांना काम करायला मिळणार असल्याने, ते सध्या प्रचंड खूश आहेत. यापूर्वी आशिष यांनी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' व 'अवताराची गोष्ट', या मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी, इंग्लिश, तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड इत्यादी भाषांतील चित्रपट केले आहेत.