Join us

आर्या आंबेकरच्या सूरात आता मीरा भजन, सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:32 IST

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली.

गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावणारी मराठमोळी मुलगी म्हणजे आर्या आंबेकर. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिनं मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. 

लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते. आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करते. तसंच आपल्या आगामी प्रोजेक्टसची माहिती चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतंच आर्याने मीरा भजन रेकॉर्ड केल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. हेमंत पेंडसे यांनी हे मीरा भजन संगीतबद्ध केले आहे.