Join us

सुश नंतर उर्मिलाचे एरिअल सिल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 14:45 IST

           बॉलीवुडची ब्युटि क्वीन सुश्मिाता सेनच्या एरिअल सिल्क डान्स फॉर्मचे दिवाने तर अनेक आहेत. सुशने ...

           बॉलीवुडची ब्युटि क्वीन सुश्मिाता सेनच्या एरिअल सिल्क डान्स फॉर्मचे दिवाने तर अनेक आहेत. सुशने या डान्स फॉर्मचे प्रशिक्षण घेतले असुन तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हा डान्स करुन वाहवा मिळविली आहे. हाच डान्स फॉर्म आता आपल्या मराठमोळ््या उर्मिला कोठारेने देखील शिकला आहे. एरिअल सिल्क शिकणारी उर्मिला हि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पहिलीच अभिनेत्री आहे. याबद्दल उर्मिलाने सीएनएक्ससोबत तिच्या या एरिअल सिल्क डान्स विषयी भरभरुन गप्पा मारल्या अन अनेक गोष्टींचा उलगडा केला.                                       उर्मिला म्हणाली, फुलवाची मुलगी आदिती देशपांडे यांच्याकडे एरिअल सिल्क शिकत होती. मी जेव्हा तीला डान्स करताना पाहिले तेव्हा पटकन बोलुन गेले आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहाणपणी असा काही डान्स फॉर्म शिकवला असता तर मी ही असा परर्फार्म करु शकले असते. तेव्हा आदितीने मला बुस्ट केले अन म्हणाली तु आजही शिकु शकतेस. मग मी गेल्या एक वर्षांपासुन एरिअल सिल्क शिकत आहे. आदिती सुश्मिता सेनची देखील ट्रेनर आहे. मी पहिल्यांदा करताना थोडी घाबरायचे आदितीने करुन दाखविलेल्या स्टेप्स मला अवघड वाटायच मग मी म्हणायचे मला जरा सोप्या स्टेप्स करुन दाखव पण ती माझ्याकडुन सर्वच स्टेप करुन घ्यायची. तुम्हाला हा डान्स फॉर्म करताना आर्म, शोल्डर अ‍ॅन्ड अप्पर बॉडी स्ट्रेन्थ प्रचंड लागते.फोटोशुट करताना देखील खुप मजा आली. कारण त्या प्रॉपर पोझला जाऊन मला काही सेकंद होल्ड करावे लागायचे मग तेजस क्लिक करायचा. मी त्याला सांगुन ठेवले होते तु एकदम रेडी रहा अगदी डोळ््यावर कॅमेरा ठेवुनच बस मी पोझ घेतल्या घेतल्या दोन तीन शॉर्ट खडखड मार म्हणजे तुला ते प्रॉपर फोटोज मिळतील. उर्मिलाचा हा डान्स फॉर्म आता आपल्याला मोठ्या पडद्यावर कोणत्या चित्रपटात पहायला मिळतोय का याचीच प्रतिक्षा तिचे चाहते नक्कीच करतील यात काही शंका नाही.