Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! आर्चीला बिग बींसोबत काम करण्यापेक्षा ही गोष्ट वाटतेय महत्त्वाची, वाचून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:28 IST

रिंकू म्हणाली, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतेय याचा मला आनंदच आहे. पण मला या गोष्टीची जास्त चिंता आहे.

बाबो..  आर्चीला बिग बींसोबत काम करण्यापेक्षा ही गोष्ट वाटतेय महत्त्वाची, वाचून कराल कौतुक

सैराटमधील आर्चीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या. नुकतीच ती हंड्रेड या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली. यात लारा दत्ताही मुख्य भूमिकेत होती. लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यापेक्षा रिंकूला दुसरीच एक गोष्ट महत्त्वाची वाटत आहे.

रिंकू राजगुरु नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अद्याप बाकी आहे. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार या आनंदापेक्षा रिंकूसाठी तिचे शिक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे वाटत आहे.

रिंकूला सिनेइंडस्ट्रीत तर खूप काम करायचे आहे पण सर्वात आधी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. याबद्दल बोलताना रिंकू म्हणाली, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतेय याचा मला आनंदच आहे. पण नवी काम सुरू करण्याआधी मला माझे शिक्षण पूर्ण करावे असे माझ्या आई वडिलांना वाटते. आता लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे मला त्यांची काळजी आहे. यापूर्वीही चित्रपटाचे शूट अर्धवट सोडून रिंकूने दहावीची परिक्षा दिली होती.

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली. नुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूअमिताभ बच्चन