ही तरूणी आहे अमेय वाघची जबरा फॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:43 IST
आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी,त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकदा या कलाकारांच्या घराबाहेर फॅन्सची मोठी गर्दी कायमच पाहायला मिळते.'दुनियादारी','मुरांबा','फास्टर फेणे'यशानंतर अल्पावधीतच ...
ही तरूणी आहे अमेय वाघची जबरा फॅन!
आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी,त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकदा या कलाकारांच्या घराबाहेर फॅन्सची मोठी गर्दी कायमच पाहायला मिळते.'दुनियादारी','मुरांबा','फास्टर फेणे'यशानंतर अल्पावधीतच अमेय रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.रसिकांना सेलिब्रिटींबद्दल असलेले आकर्षण आणि क्रेझ नेहमीच पाहायला मिळते.आता असाच अनुभव अभिनेता अमेय वाघनेही घेतला.नुकत्याच एका कार्यक्रमात अमेयला त्याच्या एका डायहार्ड फॅनला भेटण्याची संधी मिळाली.तिला भेटून अमेय फारच भावूक झाला होता.कारण तिने चक्क अमेयच्या नावाचा टॅटूही तिच्या हातावर गोंदवला आहे.अमेयने त्या तरुणीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि तिचे आभार मानले आहेत.ऐश्वर्या कडकोल असे या अमेयच्या जबरा फॅनचे नाव आहे. तसेच अमेयच्या लग्नापूर्वी त्याचे युटूब गर्ल मिथीला पालकरसह अफेअर असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.सतत ते दोघे एकत्र वेळ घातलवत असते.दोघांचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असल्यामुळे दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.त्यावेळी अमेयचे खरोखर अफेअर आहे की त्याचा हा प्रमोशन फंडा आहे अशा चर्चाही रंगल्या होत्या. अखेर त्या फक्त चर्चा ठरल्या आणि अमेयनेही असे काहीही नसल्याचे स्पष्ट करत हा सिनेमासाठी वापरलेला प्रमोशन फंडा असल्याचे म्हटले होते.मुळात अमेयला मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखले जाते.विशेषतः तरूणींच्या दिलों की धडकन असलेला अमेय काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला असून, अमेयने त्याची त्रीण साजिरी देशपांडेसोबत लग्न केले आहे. अमेयने पत्नी साजिरीबद्दल एक खुलासा केला आहे.अमेयने पत्नी साजिरीला त्याची सर्वात मोठी समीक्षक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ती माझ्या कुठल्याही कामावर सहजासहजी खुश होत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच लग्नानंतर अमेयचे एक मोठे स्वप्नही पूर्ण झाले आहे.अमेयने नुकतीच फोर्ड इको स्पोर्ट ही आलीशान गाडी विकत घेतली आहे.त्याने आपला हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. त्याने आपल्या नव्याको-या गाडीसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लिहिले, ''एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या आयुष्यात आलेला आनंद म्हणजे त्याची पहिली गाडी.