Join us

२०२५ मध्ये गाजलेला अमृता सुभाषचा 'जारण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? बघाल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:32 IST

अमृता सुभाषचा गाजलेला जारण सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कधी बघायला मिळेल

 २०२५ मध्ये अनेक सिनेमे रिलीज झाले. यापैकी महत्वाचा एक सिनेमा म्हणजे 'जारण'. अमृता सुभाष-अनिता दाते यांची प्रमुख भूमिका असलेला 'जारण' हा सिनेमा सुपरहिट ठरला. पण ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता 'जारण' ओटीटीवर बघायला मिळणार आहे. 'जारण'चा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरसह ओटीटीवर होणार आहे. जाणून घ्या

या दिवशी 'जारण' येणार ओटीटीवर

ए अँड एन सिनेमा एलएलपी आणि ए 3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस प्रॉडक्शनच्या सहकार्याने 'जारण' अनीस बझ्मी यांनी प्रेझेंट केला होता. लेखक हृषिकेश गुप्ते लिखीत- दिग्दर्शित 'जारण' हा सिनेमा खोल गाडल्या गेलेल्या कुटुंबाच्या रहस्यमयी अस्वस्थ करणाऱ्या जगात प्रेक्षकांना घेऊन जातो. 'जारण' हा सिनेमा ८ ऑगस्टला झी ५ वर रिलीज होणार आहे.

'जारण' सिनेमात भीतीचे अनामिक सावट, एक दीर्घकाळ दडपलेले रहस्य पुन्हा समोर येते. बरे न झालेले आघात सर्वात त्रासदायक मार्गांनी कसे प्रकट होतात ते समोर येते. अभूतपूर्व  रहस्य आणि तीव्र भावनिक नाट्याचे मिश्रण असलेला हा सिनेमा झी ५ वर ८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.भय आणि सत्याच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रीच्या रूपात अमृता सुभाष  सशक्त अभिनयाचे दर्शन घडवते, तिच्या व्यक्तिरेखेला असलेली भावनिक जोड हा कथेचा आत्मा आहे. अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख यांनीही सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे 'जारण' सर्वांना ८ ऑगस्टला बघायला मिळेल.

टॅग्स :अमृता सुभाषअनिता दातेकिशोर कदममराठी चित्रपटझी मराठी