Join us

Happy Birthday: अमृता खानविलकरला पतीकडून सरप्राईज, अशा दिल्या शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:00 IST

अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर तिचे एकसे बढकर एक फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठी सिनेमांसह बॉलिवूड आणि आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो नच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे. रसिकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस आहे. 

23 नोव्हेंबर 1984 रोजी तिचा जन्म झाला. मोठ्या उत्साहात रसिकांनीही अमृताचा वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांनी अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे  तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा तिच्यासोबत नसला तरी खास व्हिडीओ कॉलिंगद्वारे तिला खास शुभेच्छा देत तिच्यासाठी सुंदर असा मेसेजही सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

मराठीतील सुंदर अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे. साडीत ती जेवढी सोज्वळ दिसते तितकीच वेस्टर्न आउटफिटमध्ये चाहते तिच्या लूक्सवर फिदा होतात. अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर तिचे एकसे बढकर एक फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

काहीदिवसांपूर्वीच अमृताने तिच्या परदेश दौ-यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आयफिल टॉवरसह वेगवेगळ्या ठिकाणांनाही तिने भेट दिली. या फोटोंनाहीनेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

टॅग्स :अमृता खानविलकर