Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अमृता खानविलकर सांगतेय तिच्या फिटनेसचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 11:49 IST

अमृता ही खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तिने फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यांसारख्या मराठी ...

अमृता ही खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तिने फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यांसारख्या मराठी चित्रपटात तर फूंक २, फूंक यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अमृता ही एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे. तिने एकापेक्षा एक या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य सादर केले होते. वाजले की बारा या लावणीवरील तिच्या नृत्यावर तर तिचे फॅन्स अक्षरशः फिदा आहेत. नच बलिये या कार्यक्रमात देखील ती तिचे पती हिमांशू मल्होत्रासोबत सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमाचे विजेतपद देखील तिला मिळाले होते. ती एक चांगली डान्सर असल्याचे बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी देखील या कार्यक्रमात म्हटले होते. सध्या ती डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. तसेच मेघना गुलजार दिग्दर्शित राझी या हिंदी चित्रपटात ती लवकरच झळकणार आहे.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकरचे धमाकेदार नृत्य पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिली होती. सोहळ्याच्या तयारी पासून ते सोहळा संपन्न होईपर्यंत अमृताचा कमालीचा उत्साह तिने टाकलेल्या सोशल साईट वरच्या व्हिडिओ वरून दिसत होता. तिने डान्स रिहर्सल करतानाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसेच तिने नुकतेच सोशल साईटवर लाईव्ह येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला होता.या वेळी तिने तिच्या फॅन्सना सांगितले होते की, नव्या वर्षात अमृता फिटनेसबद्दल चाहत्यांना काही टिप्स देणार आहे. "तू फिट कशी राहतेस किंवा तू मुळातच बारीक आहेस असे अनेकांनी मला सांगितले. पण असे नसून फिटनेस साठी सातत्य आणि मेहनत या दोन गोष्टींचा सामना करावा लागतो आणि म्हणून पुढचे काही महिने मी फिटनेस वर बोलणार आहे" असे अमृता सांगते. या लाईव्ह चॅट मध्ये चाहत्यांनी तुला राजकारणात यायचे आहे का? तसेच तिच्या आवडत्या कलाकारांबद्दल देखील प्रश्न विचारले होते. Also Read : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राने साजरी केली 3rd Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम