Join us

अमृताने दिल्या शहंनशहाला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 08:35 IST

             बॉलीवुडचे बिग बी म्हणजेच आपले अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर फिदा असलेले त्यांचे हजारो चाहते ...

             बॉलीवुडचे बिग बी म्हणजेच आपले अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर फिदा असलेले त्यांचे हजारो चाहते जगभरात आहेतच. कोणताही पुरस्कार सोहळा असो अमिताभजींना त्यांच्या कामाची पावती त्या पुरस्कार सोहळ््यात मिळतेच मिळते. आता पर्यंत त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ मोठाले पुरस्कार पटकावले आहेत. यंदाही त्यांना पिकु या चित्रपटासाठी नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळत आहे. आणि अमिताभजींचे कौतुक जगभरातील त्यांचे चाहते तर करीतच आहेत परंतू फिल्मी दुनियेतील सितारे देखील त्यांच्या या पुरस्कारमुळे खुश झाले आहेत. आपली वाजले कि बारा क्वीन अमृता खानविलकरने तर बिग बींना या पुरस्काराबद्दल सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभजीं सोबतचा एक सेल्फी अमृताने अपलोड केला असुन ती नॅशनल अ‍ॅवॉर्ड साठी बच्चनजींना कॉंग्रॅज्युलेशन्स करीत आहे.