Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता बनली सोशलमिडीयावर क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 19:02 IST

वाजले की बारा या गाण्याने प्रत्येकाला थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशलमिडीयावर देखील क्वीन बनली आहे. ती मराठी इंडस्ट्रीतील ...

वाजले की बारा या गाण्याने प्रत्येकाला थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशलमिडीयावर देखील क्वीन बनली आहे. ती मराठी इंडस्ट्रीतील पहिली अभिनेत्री ठरली आहे की, जिचे टिवीटरवर ५० हजार फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. याविषयी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधला असता अमृता म्हणाली, हा आकडा पाहून खरचं खूप आनंद झाला आहे. ५० हजार हा आकडा पाहून खूप भारी वाटतं  कारण हा आकडा नेहमीच बॉलीवुड सेलिब्रिटींमध्येच पाहायला मिळतो. तसेच मराठी सेलेब्रिटींचा एवढा रीच नसतो हे  वाक्य आज अपवाद ठरलेले दिसत आहे. माझे फॉलोवर्स हे हिंदी व मराठी दोन्हींमध्ये आहेत. आजचे तरूण ही जागृत झालेले दिसत आहे. ते निष्ठेने इतके फॉलोवर्स करतात. छान असेल तर कौतुक  करतात  त्याचबरोबर सजेशन ही देतात. खरचं या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानते.