अमेय वाघला मिळाली ब्लू स्टिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 13:05 IST
प्रत्येक कलाकारांसाठी प्रेक्षक ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती ही प्रेक्षकच देत असतात. ...
अमेय वाघला मिळाली ब्लू स्टिक
प्रत्येक कलाकारांसाठी प्रेक्षक ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती ही प्रेक्षकच देत असतात. त्यामुळे प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार आहेत. कलाकारांच्या कामाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी चाहता वर्ग असला की, कलाकारदेखील आत्मविश्वासाने काम करून यशाच्या मार्गाने वाटचाल करत असतात. असाच चाहतावर्ग सध्या अभिनेता अमेय वाघला भरभरून प्रेम देत असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. हो, कारण अमेयला फेसबुक अकाऊंटला ब्लू स्टिक मिळाले आहेत. त्यामुळे सध्या त्याची परिस्थिती आज मैं उपर, आसमा निचे, आज मैं आगे जमाना है पीछे ... अशीच काहीशी झाली आहे. आपला हा चाहतावर्ग पाहता, त्याने ही सोशलमीडियावर सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या टेक्नीकल टीमचेदेखील कौतुक केले आहे. अमेयला ब्लू स्टिक मिळाल्याने त्याच्या चाहत्यांनादेखील आनंद झाला असल्याचे दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी सोशलमीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण यंदा या आनंदाच्या गोष्टीबरोबरच अमेयची गाडी सुसाट निघाली आहे. नाटक, वेबसीरीज, चित्रपट पाठोपाठ आता तो पुन्हा त्याच्या लोकप्रिय मालिकेतूनदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या तो मॅड २ या रियालिटी शोच्या माध्यमातून सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. त्याचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर तो लवकरच एका आगामी चित्रपटातदेखील झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे.म्हणूनच अमेयला एकापाठोपाठ लॉटरीच लागली असे म्हणण्यास हरकत नाही.