Join us
Daily Top 2Weekly Top 5

किशोरी शहाणे यांच्या पतीविषयी या गोष्टी माहितीय का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 10:00 IST

किशोरी आजही मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारताना दिसतात. विशेष म्हणजे वयाच्या ५३ व्या वर्षीही त्या पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसतात.

मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज या केवळ अभिनेत्रीच नाही तर क्लासिकल डान्सरही आहेत. 'माझा पती करोडपती', 'प्रेम करुया खुल्लम खुल्ला' यांसारख्या चित्रपटांतून नावारुपाला आलेल्या किशोरी यांनी नव्वदीचा काळ आपल्या अभिनयाने गाजवला आणि आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. किशोरी शहाणे आजही रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.

किशोरी आजही मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारताना दिसतात. विशेष म्हणजे वयाच्या ५३ व्या वर्षीही त्या पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसतात. अभियाप्रमाणे चाहते आजही त्यांच्या सौंदर्यावर फुल ऑन फिदा होतात. त्यांचे सौंदर्य पाहून चाहत्यांना त्यांच्या वयाचा अंदाज लावणेही अशक्य होते.अगदी लहानपणापासून किशोरी यांना अभिनयाची आवड होती.

विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. शिवाय स्वतःचा फिटनेस कायम टिकून रहावा यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत असतात. त्यांचं या वयातही फिटनेसबाबत सजग असणं आणि त्यांनी टिकवलेलं सौंदर्य याचं बॉलीवुडची क्वीन कंगणालाही अप्रूप वाटलं होतं. त्यामुळेच की काय आजही किशोरी शहाणे यांना चांगल्या दर्जेदार भूमिका ऑफर केल्या जात आहेत.  

किशोरी शहाणे यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते दिपक बलराज वीज यांच्यासोबत झाले आहे.  दिपक यांनी 'जान तेरा नाम' या प्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्‍यांनी एकूण २२ सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. किशोरी यांचे सासरे बलराज वीज यांनी पूर्वी बॉलीवुडचे हिमॅन धर्मेंद्रसोबत काही सिनेमात भूमिका साकारल्यात आहेत.

किशोरी आणि दिपक एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांमध्ये असलेली केमिस्ट्रीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. दोघेही एकमेकासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतात. किशोरी आणि दिपक यांना एक मुलगा आहे. बॉबी वीज असे मुलाचे नाव आहे. 

टॅग्स :किशोरी शहाणे