Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय झळकणार व्हिडीओ म्युझिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 13:29 IST

 दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून अमेय वाघने अनेक तरूणांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे साहजिकच अमेय काय करत असेल याची ...

 दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून अमेय वाघने अनेक तरूणांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे साहजिकच अमेय काय करत असेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली असते. दिल दोस्ती दुनियानादारीनंतर अमेय रंगभूमीवर  दिसतच होता. त्याचबरोबर निपुण धर्माधिकारीसोबत तो कास्टिंग काउच या वेबमालिकेतदेखील पाहायला मिळत आहे. आता तो थेट एक म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे. या म्युझिक व्हिडीओचे नाव कमबख्त सरदियाँ असे आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुरभी मलिक पाहायला मिळणार आहे. या व्हिडीओमधील गाणे ह्रषिकेश रानडे याने गायले असून खलिल अभ्यंकरने संगीत दिले आहे. तसेच या गाण्याचे बोल शत्रुंजय मिश्रा यांनी लिहले आहे. तर  दिग्दर्शन यश गद्रे यांनी केले आहे. चला तर पाहूयात, अमेयचा हा हटके प्रयत्न चाहत्यांच्या पसंतीस उतरतो का?