Join us

All is Well अजय गोगावले यांना हृयविकाराचा झटका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 12:59 IST

मराठीसह बॉलिवूडमधील प्रसिध्द संगीतकराची जोडी असलेली अजय अतुल यांच्यातीतल अजय गोगावले यांना शुक्रवारी रात्री छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला.त्यामुळे ...

मराठीसह बॉलिवूडमधील प्रसिध्द संगीतकराची जोडी असलेली अजय अतुल यांच्यातीतल अजय गोगावले यांना शुक्रवारी रात्री छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला.त्यामुळे वांद्रे येथील लिलावती रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही बातमी बघता बघता वा-यासारखी पसरली त्यामुळे अजय गोगागवले यांनी हृदयविकाराचा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र लिलावती रूग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांनी हृदयविकारच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे रूग्णालयाने स्पष्ट केले असून अजय यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना छातीत दुखु लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.त्यामुळे मराठी संगीत रसिकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नसून सगळे काही ऑल इज वेल आहे.