अक्षयची रंगभूमीवर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 13:52 IST
मराठी चित्रपटाप्रमाणेच आता रंगभूमी देखील सातासमुद्रापार पोहचली आहे. आपली अनेक नाटके परदेशात देखील झळकली आहेत. नाटकांना प्रेक्षक नसतीे असे ...
अक्षयची रंगभूमीवर एन्ट्री
मराठी चित्रपटाप्रमाणेच आता रंगभूमी देखील सातासमुद्रापार पोहचली आहे. आपली अनेक नाटके परदेशात देखील झळकली आहेत. नाटकांना प्रेक्षक नसतीे असे म्हणायची वेळ आता निघुन गेली आहे. कारण बºयाच नाटकांचे दौरे परदेशी होऊ लागले आहेत. नोटा बंदीच्या काळात देखील प्रेक्षकांनी एकवेळ सिनेमांकडे पाठ फिरवली असेल पण नाटकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच कि काय कलाकार रंगभूमीकडे वळू लागले आहेत. चित्रपट-मालिकांमध्ये काम करणारे बरेच प्रसिदध कलाकार रंगमंचावर अभिनय करताना आता पाहायला मिळतात. असाच एक अभिनेता म्हणजे अक्षय वाघमारे. युथ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारलेला अक्षय लवकरच आपल्याला रंगमांचवर दिसणार आहे. या नाटकामध्ये तो आपल्याला विक्षिप्त अशा भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि अनिरूद्ध खुटवड दिग्दर्शित खेळी मेळी या नाटकात अक्षयची प्रमुख भूमिका आहे. अक्षय या नाटकांतून पहिल्यांदाच रंगभूमीवर येत आहे आणि या नाटकासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, असे त्याने सांगितले. या अगोदर अक्षय होऊ दे जरासा उशीर, मुंबई पुणे मुंबई २, आम्ही उद्याचे हिरो या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता आणि आता लवकरच दोस्तीगिरी या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. थिएटर स्पेस निर्मित खेळी मेळी या नाटकाचा शुभारंभ १७ डिसेंबर रोजी पुणे येथील ज्योत्सा भोळे सभागृह येथे सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. अक्षय सह या नाटकात श्रीकांत बाडगे, कृतर्थ शेगांवकर, ओमकार भस्मे, पूजा बाबे आणि मकरंद केंद्रे या कलाकारांचा पण अभिनय पाहायला मिळणार आहे. चित्रपटात तर अक्षयने स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. आता तो रंगभूमीवर काय कमाल करतोय हे तर आपल्याला लवकरच समजेल.