Join us  

बॉलिवूड सिनेमातून अजिंक्य देवला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:02 PM

Ajinkya deo: हा सिनेमा यश चोप्रा यांचा असल्याचं म्हटलं जातं. परंतु, अजिंक्यने कोणाचंही नाव न घेता हा किस्सा शेअर केला.

मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारा हँडसम, देखणा अभिनेता म्हणजे अजिंक्य देव (Ajinkya deo). जबरदस्त पर्सनालिटीमुळे अजिंक्य देव त्याकाळी अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला होता. तेव्हाच कशाला आजही त्याची क्रेझ तरुणींमध्ये पाहायला मिळते. आजवरच्या कारकिर्दीत अजिंक्य देवने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर काही हिंदी सिनेमांमध्येही तो झळकला. परंतु, एका गाजलेल्या बॉलिवूड सिनेमातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अलिकडेच अजिंक्य देवने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने हा मोठा खुलासा केला आहे.

अजिंक्यने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात खासकरुन त्याने त्याच्या फिल्मी करिअरविषयी अनेक खुलासे केले. यावेळी बोलत असताना मला एका मोठ्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं असं तो म्हणाला.

"एक मोठा हिंदी चित्रपट मी करणार होतो. मला त्याचं नाव नाही घ्यायचं पण खूप मोठा चित्रपट होता. माझं आयुष्य बददलं असतं. अगदी सगळं फायनल झालं होतं. कपड्यांची मापं घेण्यापर्यंत सगळं झालं होतं आणि शेवटच्या क्षणी मला त्यातून काढून टाकलं", असं अजिंक्य देव म्हणाला.

'लक्ष्या-अशोक मामांची लाट आल्यामुळे मी साईड ट्रॅक झालो'; अजिंक्य देवने व्यक्त केली खंत

पुढे तो म्हणतो, "खूप मोठा चित्रपट होता पण तो. आता मला कोणाची नावं नाही घ्यायची. तो चित्रपट झाला असता तर खूप चित्र बदललं असतं." दरम्यान, अजिंक्य देवला ज्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तो सिनेमा यश  चोप्रा यांचा असल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही तर ही भूमिका कोणा अन्य व्यक्तीला द्यावी लागत आहे, असं कारण देत अजिंक्यला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं.

टॅग्स :अजिंक्य देवयश चोप्राबॉलिवूडमराठी अभिनेता