Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीमध्ये पहिल्यांदाच घडतंय ही गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:15 IST

‘रात चांदणं’ ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर ‘रूपाचं चांदणं’ हा सीक्वल. आजपर्यंत आपण चित्रपटाचे सीक्वल आलेले पाहिले आहेत पण आता मराठी अल्बममध्ये पहिल्यादांच गाण्याचा सीक्वल आला आहे.

आजपर्यंत आपण चित्रपटाचे सीक्वल आलेले पाहिले आहेत पण आता मराठी अल्बममध्ये पहिल्यादांच गाण्याचा सीक्वल आला आहे.‘रात चांदणं’ ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर ‘रूपाचं चांदणं’ हा सीक्वल, दिग्दर्शक सचिन आंबात आणि त्याची ‘स्वप्न स्वरूप’ टीम घेऊन आली आहे. आपल्या अस्सल आग्री कोळी भाषेतलं हे गाणं आहे.  गाण्याच्या पहिल्या भाग म्हणजेच रात चांदणं युट्युबवर आतापर्यंत  20 लाख (2 मिलियन) लोकांनी पाहिलं आहे,  ह्या गाण्यात  तरुण वयाच्या मुलाचे एकतर्फी प्रेम दाखवण्यात आले होते,  आता हिच गोष्ट पुढे दाखवण्यात आली आहे "रूपाचं चांदणं" ह्या गाण्यात. 

"रूपाचं चांदणं" ह्या गाण्याचे आणि शब्द सचिन आंबात ह्यांनी लिहले आहेत, संगीत हे विक्की अडसुळे, रोहित ननावरे यांचे आहे.  केवल वाळंज, साधना काकतकर ह्यांनी गायले आहे. निलेश भगवान आणि सोनल पवार ह्या दोघांवर हे गाणं चित्रित केले गेले आहे.  सागर आंबात  ह्यांनी चित्रीकरण व देवा आव्हाड ह्यांनी संकलन केले आहे आणि प्राजक्ता शेलार, हर्षद ह्यांनी ह्या गाण्याचे नुत्यदिग्दर्शन केले आहे. ह्या दोन्ही गाण्याचे दिग्दर्शन सचिन रामचंद्र आंबात यांनी केले आहे. 

टॅग्स :संगीत