अॅडल्ट्स ओन्ली होणार मोबाईलवर शुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 12:57 IST
मराठी सिनेसृष्टीतील चित्रपटांची कथा, नवीन चेहरे, लोकेशन आदी गोष्टींमध्ये निराळे बदल होत आहेत. ...
अॅडल्ट्स ओन्ली होणार मोबाईलवर शुट
मराठी सिनेसृष्टीतील चित्रपटांची कथा, नवीन चेहरे, लोकेशन आदी गोष्टींमध्ये निराळे बदल होत आहेत. या बदलांमुळे मराठी सिनेसृष्टीचे सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे. आता आणखी एक नवीन बदल होणार आहे तो म्हणजे चित्रपटाच्या चित्रिकरणाचे माध्यम. महागडे कॅमेरे, तंत्रज्ञानाशी निगडीत वस्तू या गोष्टींपेक्षा वेगळ्या पध्दतीने पण चित्रपटाचे चित्रीकरण करता येऊ शकते हे लवकरच सिध्द होणार आहे अॅडल्ट्स ओन्ली या आगामी चित्रपटातून. मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित अॅडल्ट्स ओन्ली या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग आयफोन 6 एस प्लस वर होणार आहे. हॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच चित्रपट आयफोन शूटवर होत आहे. या चित्रपटाची निर्मिती अमित धुपे आणि अजय ठाकूर यांनी केले असून चित्रपटाच्या चित्रिकरणाला आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. एक नवीन प्रयोग मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे. मराठी फिल्म इंडस्ट्री आता सातासमुद्रापार पोहचली आहेच. आपले चित्रपट परदेशातही झळकत असुन त्यांना जगभरातून वाहवा मिळत आहे. परदेशी चित्रपटांमध्ये वापरले जाणारे टेक्निक आता पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला पहायला मिळणार आहे. मोबाईलवर शुट होणारा हा सिनेमा मोठ्या पडद्यावर कसा दिसतो हे पहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.