Join us

आदितीचे ‘ट्रकभर स्वप्नं’मधून कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 08:15 IST

‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री आदिती पोहनकरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

ठळक मुद्देतब्बल ४ वर्षानंतर अदिती करतेय मराठीत पुनरागमन‘ट्रकभर स्वप्नं’मध्ये अदिती दिसणार वेगळ्या भूमिकेत

‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री आदिती पोहनकरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. या चित्रपटानंतर गायब झालेली आदिती पोहनकर आगामी कोणत्या चित्रपटातून झळकणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आदितीच्या चाहत्यांची ही उत्सुकता आणि प्रतिक्षा आता लवकरच संपणार असून ‘लय भारी’ या मराठी चित्रपटानंतर दक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री अदिती पोहनकर ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 

‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी चित्रपटात अदिती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केले आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना आदिती सांगते की, ‘आजवरच्या माझ्या ग्लॅमरस भूमिकांपेक्षा वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका मला ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात साकारायला मिळाली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल.’

‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात आदितीसोबत मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी,मनोज जोशी स्मिता तांबे, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाचे निर्माते आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. येत्या २४ ऑगस्टला ‘ट्रकभर स्वप्नं’ घेऊन आदिती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.