Join us

​ आदिनाथ सांगतोय, काहीतरी शिजतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:25 IST

  priyanka londhe  अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्याला लवकरच एका वेगळ््या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसातच तो प्रेक्षकांना एका चित्रपटात ...

  priyanka londhe  अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्याला लवकरच एका वेगळ््या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसातच तो प्रेक्षकांना एका चित्रपटात एकदम हटके अंदाजात पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. सध्या तो काही चित्रपटांच्या आणि मालिकेच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. तर त्याने नुकताच लेखक आणि डिओपी यांच्या सोबतचा एक झक्कास फोटो सोशल साईट्सवर शेअर केला आहे. हा फोटो एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आदिनाथने क्लिक केल्याचे समजतेय. परंतु या चित्रपटाचे नाव आणि यातील आदिनाथची भूमिका मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच सध्या आदिनाथकडे काहीतरी शिजतंय असे म्हणायला काहीच हरकत नाही.