Join us

सई ताम्हणकरला बोल्ड म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, म्हणाली, 'मला पण भावना आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 16:19 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मात्र नुकतेच तिने तिला बोल्ड म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मात्र नुकतेच तिने तिला बोल्ड म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. तिने मी देखील साधारण व्यक्ती असून मला पण भावना आहे, असे म्हटले आहे. सई ताम्हणकर हिने नुकतेच इट्स अ गर्ल थिंग व्हर्चुअल फेस्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.

सई ताम्हणकर म्हणाली की, लोक मला बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतात. पण त्यांना मी सांगू इच्छिते की, ते सर्व बोल्ड पात्र जे मी पडद्याच्या मागे साकारले आहेत. मी अगदी सामान्य व्यक्ती आहे आणि मला पण भावना आहेत.

तिने पुढे सांगितले की, मी शाळेच्या कार्यक्रमात देखील कधीच भाग घेतला नव्हता. पण माझ्या मावशीने मला अभिनय करण्यासाठी सांगितला आणि मी तयार झाले. मी सर्वात आधी नाटकात काम केले. त्या नाटकाचे नाव होते आधी अधुरे. ते माझे पहिले नाटक होते. 

इट्स अ गर्ल थिंग व्हर्चुअल फेस्टमध्ये मुलींना सई ताम्हणकरने सल्ला दिला की, मी सल्ला देईन की मुलींसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यात कोणतीच तडजोड करू नका. याशिवाय आपले आयुष्य परिपूर्णतेने जगा, धाडसी व्हा, कधीही कशाचा त्याग करू नका. आपल्या आई वडिलांशी जमेल तितका संवाद साधा. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा जेणेकरून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल.

सई ताम्हणकरने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले की, पॉण्डिचेरी, मीडियम स्पायसी हे मराठी चित्रपट आणि मिमी व इंडियाज लॉकडाउन हे हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकर