Join us

​अभिनेत्री उषा जाधव बनली गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 09:45 IST

मराठी कलाकार आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जगभरातील अनेक भाषांतील चित्रपटातून भूमिका करतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र आता एक ...

मराठी कलाकार आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जगभरातील अनेक भाषांतील चित्रपटातून भूमिका करतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र आता एक मराठी अभिनेत्रीने एका इंटरनॅशनल चित्रपटासाठी गाणं गायले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे उषा जाधव. उषाने एका इंटरनॅशनल चित्रपटासाठी तब्बल चार गाणी रेकॉर्ड केली आहे. स्वत: उषाने हि माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरु झाले आहे. 'शेक इट्बेबी' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका स्पॉनिश आणि ब्रिटिश कलाकार साकारणार आहेत. बाफ्ता विजेता सीयान फिलिप्स आणि ब्रॉडवे अभिनेता बिली कोलम यांचा या चित्रपटात समावेश आहे. हा एक संगीतावर आधारित चित्रपट असल्याची माहिती मिळते आहे. उषा तिच्या या चित्रपटाला घेऊन नक्कीच उत्सुक असेल यात काही शंका नाही. काही दिवसांपूर्वी उषा कास्टिंग काऊचवर केलेल्या वक्तव्यानंतर ती चर्चेत आली होती. ALSO READ :  #MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा उषा जाधव ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात तिने नाटकातून केली होती. 2012 प्रदर्शित झालेला 'धग' सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. या सिनेमानंतर अनेकांनी तिची तुलना थेट स्मिता पाटील यांच्याशी केली. मराठी नाटक, सिनेमासह उषा जाधवने हिंदीतही आपला ठसा उमटवला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'ट्रॅफिक सिग्नल'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. 2012 मध्ये ती महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या जाहिरातीतही झळकली होती. याशिवाय स्टार प्लसवरील 'लाखो में एक' या कार्यक्रमात उषाने काम केलं आहे.