Join us

नाट्यगृहाच्या सफाईसाठी अभिनेता प्रशांत दामलेंच्या हाती झाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:11 IST

औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह सध्या मोडकळीस आलं आहे. महापालिका सुधारणा करीत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंसह अन्य कलाकारांनी नाट्यगृहाच्या ...

औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह सध्या मोडकळीस आलं आहे. महापालिका सुधारणा करीत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंसह अन्य कलाकारांनी नाट्यगृहाच्या डागडुजीचं काम हाती घेतलं.

 संत एकनाथ नाट्यगृह सध्या मरणयातना भोगत आहे. या हॉलला नाट्यगृह म्हणावं का, असा प्रश्न नाट्यरसिकांसह कलाकरांनाही पडला. अखेर नाट्यकर्मींनी हातात झाडू घेत रंगमंचाची साफसफाई सुरु केली.

 काही कलाकारांनी रंगमंचावरील खिळे ठोकले तर, फाटलेल्या खुर्च्या आणि पडदेसुद्धा या नाट्यप्रेमींनी शिवले. काम नावासाठी नाही तर गावासाठी करीत असल्याचं या नाट्यकर्मींचं म्हणणं आहे.

 राज्यभरातील नाट्यगृहांची अशीच उपेक्षा होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी प्रशांत दामले यांनी केली आहे.