Join us

'फुगे'च्या यशासाठी स्वप्नीलच्या चाहत्याने केला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला 'अभिषेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:15 IST

बॉलिवुडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा चाहतावर्ग मोठा आहे. या कलाकारांचे चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील हे खरचं सांगता येत ...

बॉलिवुडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा चाहतावर्ग मोठा आहे. या कलाकारांचे चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील हे खरचं सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याचा फुगे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.           या चित्रपटाला यश मिळावे यासाठी स्वप्नीलच्या चाहत्याने चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडे साकडे घातले. एवढेच नाही तर, या पट्टयाने देवीचा अभिषेक देखील केला. त्यासाठी त्याने भरलेल्या पावतीवर स्वप्नील जोशी यांच्या 'फुगे' फिल्मसाठी असा मजकूर लिहिलेला फोटो ट्वीट करत स्वप्नील जोशीबद्दलचे त्याचे प्रेम सिद्ध केले. स्वप्नीलने देखील त्याला प्रतिसाद देत, आपण भरून पावलो अशी प्रतिक्रिया त्याला दिली. किरण जाधव असे या चाहत्याचे नाव आहे.                 स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित फुगे हा चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशीसोबत सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे झळकणार आहेत. तर अभिनेत्री नीता शेट्टीदेखील असणार आहे. ती या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करत आहे. तसेच स्वप्नील-सुबोधला पहिल्यांदाच एकत्र आणणाºया या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत आहे.फुगे या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घालत आहे. काही कळे तुला... हे गाणे काहीच दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगला प्रदर्शित झाले. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यावर निर्मात्यांनी २० लाखांहूनही अधिक खर्च केला आहे. यामुळे यावर्षीच्या सर्वात महागड्या गाण्यांच्या यादीत या गाण्याचा समावेश झाला आहे.           महाराष्ट्रात १० फेब्रुवारीला सर्वत्र 'फुगे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  आवडत्या कलाकारांचा चित्रपट पाहण्याची आतुरतेने वाट त्यांचे चाहते देखील पाहत आहे.