आमिरला आवडला 'नटसम्राट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 07:01 IST
नटसम्राट या चित्रपटाची चर्चा मराठी इंडस्ट्रीनंतर आता, बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये देखील चालू आहे. कारण, या चित्रपटाचे यश पाहता, तो पाहण्याचा ...
आमिरला आवडला 'नटसम्राट'
नटसम्राट या चित्रपटाची चर्चा मराठी इंडस्ट्रीनंतर आता, बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये देखील चालू आहे. कारण, या चित्रपटाचे यश पाहता, तो पाहण्याचा मोह बॉलिवुडकरांनादेखील आवरला नाही. कारण नुकतेच अर्जुन कपूरने नटसम्राट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर आश्चर्य, म्हणजे नटसम्राट हा चित्रपट परफेक्शनिस्ट आमिर खान याने पाहिला आणि त्याचे भरूभरून कौतुक देखील ट्वििटरवर केले आहे. आमिर म्हणाला, मी हा चित्रपट पाहिला आहे.या चित्रपटात नानांचा अभिनय दमदार आहे. त्याचप्रमाणे विक्रम गोखले यांची भूमिका देखील जबरदस्त आहे. खरंच 'असा नट होणे' नाही }}}}