Join us

आमिर खान थिरकला मराठी गाण्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 08:12 IST

आमिर खान याने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे बरेच दिवस चर्चेत होता.यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील मोठा निराश होता. आपल्याच याच ...

आमिर खान याने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे बरेच दिवस चर्चेत होता.यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील मोठा निराश होता. आपल्याच याच चाहत्यावर्गाला खूष करण्यासाठी  मिस्टर परफेक्शनिस्टने रविवारी झालेल्या गिरगाव येथील मेक इन इंडिया या कार्यक्रमात अजय-अतुल या धडाकेबाज जोडीच्या मराठी गाण्यांवर पाय थिरकवून मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच या कार्यक्रमाला राजकीय व बॉलीवुडमधील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी कविता सादर केली होती. तर हेमा मालिनी यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरवात झाली होती.