Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘गेला उडत’ म्हणत मिळाले ५ नामांकने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:49 IST

प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रॉडक्शनची ५३ वी नाट्यकृती आणि केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘गेला उडत’ या नाटकाला झी टॉकीज कॉमेडी ...

प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रॉडक्शनची ५३ वी नाट्यकृती आणि केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘गेला उडत’ या नाटकाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मध्ये ५ नामांकने मिळाली.

सिध्दार्थ जाधवने गेला उडत म्हणत ५ नामांकने मिळवली. नामांकना विषयी जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच असेल.  नामांकनाची नावे खालील प्रमाणे दिली आहेत.

सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक- गेला उडत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केदार शिंदे

सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिध्दार्थ जाधव

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अर्चना निपाणकर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- श्वेता घरत बर्वे

भद्रकाली प्रॉडक्शन, केदार शिंदे यांचं दिग्दर्शन आणि सिध्दार्थची प्रमुख भूमिका या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करतंय, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सिध्दूनं त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मन तर जिंकलंच आहे.

आम्हां सर्वांतर्फे ‘गेला उडत’ च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!