Join us
Daily Top 2Weekly Top 5

३५ टक्के काठावर पास टायटल साँग रिलिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 09:26 IST

            मला वेड लागले प्रेमाचे गाणारा दगडु टाईमपास मधील त्याच्या अल्लड अन बिनधास्त भुमिकेमुळे ...

            मला वेड लागले प्रेमाचे गाणारा दगडु टाईमपास मधील त्याच्या अल्लड अन बिनधास्त भुमिकेमुळे सर्वांच्याच मनात घर करुन बसला आहे. प्रथमेश परबचा आगामी चित्रपट ३५ टक्के पास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असुन त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. साईराज नावाचे कॅरॅक्टर प्रथमेश या चित्रपटात करणार असुन हा रोल दगडुच्या जवळ जाणारा वाटत असला तरी तो वेगळा आहे असे प्रथमेश सांगतो. सिंगल पसली जरी असलो ना, तरी डोक्यावर मारूतीचा हात आहे आणि जेवणात साई भंडाराचा भात आहे ! या डायलॉगने हे गाणे सुरु होते. प्रथमेशने टाईमपास मध्ये त्याच्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता या नव्या गाण्याची झिंग रसिकांवर कितपत चढतेय ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल