Join us  

'भरत, रंगमंच तुझा आहे, त्यावर बागड'; केदार शिंदेनं शेअर केली 'सही'ची एकदम सही आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:10 AM

लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव यांच्या 'सही'च्या प्रवासाला आज १८ वर्षे पूर्ण झालीत. या नाटकाने देशातील आणि देशा बाहेरील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आजही या नाटकाची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

'सही'ने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने केदार शिंदे यांनी या नाटकाच्या सुरूवातीच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय. भरत जाधव यांनी कशाप्रकारे 'सही'चा रथ पुढे पुढे नेला हे सांगितलंं. तसेच त्यांनी यात मोलाची साथ देणाऱ्या अभिनेता अंकुश चौधरीचाही उल्लेख केला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून 'सही रे सही' नाटकाचे हाउसफूल प्रयोग सगळीकडे होत होते. अशात अचानक कोरोना व्हायरसमुळे 'सही'चे प्रयोग थांबलेत. पण प्रेक्षकांना पुन्हा हे नाटक बघण्याची उत्सुकता लागलेली असेलच. कोरोनानंतर किंवा दरम्यान 'सही'चे प्रयोग पुन्हा एकदा सुरू होतील अशी आशा केदार शिंदे यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा 'सही'चे प्रयोग सुरू व्हावेत आणि प्रेक्षक पुन्हा एकदा खळखळून हसावे अशा आमच्याही 'सही'च्या टीमला शुभेच्छा!

हे पण वाचा :

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय; तिथे 'देवी' जागृत आहे; केदार शिंदेंचा सरकारला टोला

 सुशांतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख; पण आता बास्स झालं...! मराठी दिग्दर्शक केदार शिंदे संतापले!!

टॅग्स :केदार शिंदेभरत जाधवनाटकअंकुश चौधरी