Join us

"जाते नहीं कही रिश्ते पुराने...", अभिनेता जितेंद्र जोशीच्या वाढदिवसानिमित्त संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:06 IST

मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरकडे (Santosh Juvekar) पाहिलं जातं.

Santosh Juvekar Post: मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरकडे (Santosh Juvekar) पाहिलं जातं. आपल्या  दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. नाटक, टीव्ही, चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत संतोषने प्रेक्षकांचे मनावर राज्य केलं आहे. दरम्यान, मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावरही त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल त्याचे चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. दरम्यान, आज २७ जानेवारीच्या दिवशी मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संतोष जुवेकरनेसोशल मीडियावर हटके अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

संतोष जुवेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत जितेंद्र जोशीसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "जाते नहीं कही रिश्ते पुराने! जित्या आय लव्ह यू. बाकी काय ते वाढदिवसाच्या शुभेच्या वैगरे तूला. हॅप्पी बर्थडे जान!" अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपल्या मित्राला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्याच्या पाहायला मिळतंय. दरम्यान, संतोष जुवेकरने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट करत जितेंद्र जोशीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तो 'छावा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलसोबत या सिनेमात तो स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अलिकडेच संतोष जुवेकर 'रानटी' सिनेमात दिसला. या सिनेमात त्याने केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. 

टॅग्स :संतोष जुवेकरजितेंद्र जोशीमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया