Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे त्यांच्या एकापेक्षा एक चित्रपटासाठी आणि गाजलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक, विनोदी अशा सर्वच भूमिका त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. अलिकडेच अशोक सराफ यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचं स्वत:चं ऑफिशियल अकाऊंट सुरू केलं आहे. प्रेक्षकांचे हे लाडके अभिनेते आता सोशल मीडियाद्वारे त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच नुकतीच त्यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
अशोक सराफ यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर सुंदर पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, आज जागतिक रंगभूमी दिन... त्या स्टेजला सलाम जिथे स्वप्नं रंगवली जातात! अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला, 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुमधडाका', 'माझा पती करोडपती', 'साडे माडे तीन', 'फेका फेकी', 'नवरा माझा नवसाचा' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सध्या ते 'अशोक मा.मा.' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. लवकरच अशोक मामा अशी ही जमवा जमवी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.