Join us  

उर्मिला निंबाळकरने धुडकावली Bigg boss marathi ची ऑफर; 'या' कारणामुळे दिला शोला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 9:54 AM

Urmila nimbalkar:गेल्या काही काळापासून उर्मिला कलाविश्वातील वावर कमी झाला आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चिला जाणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी( bigg boss marathi). आतापर्यंत या शोचे चार पर्व पार पडले असून प्रत्येक पर्व चांगलंच गाजलं आहे. विशेष म्हणजे बिग बॉस हा कार्यक्रम जितका गाजतो तितकेच त्यात सहभागी झालेले कलाकारही चर्चेत येत असतात. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज आणि लोकप्रिय सेलिब्रिटी झळकले आहेत. यामध्येच आता बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात उर्मिला निंबाळकर सहभागी होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याविषयी उर्मिलाने एक पोस्ट शेअर करत ती खऱंच या शोमध्ये सहभागी होणार की नाही? हे सांगितलं आहे.

अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये झळकलेला उर्मिला आज प्रसिद्ध आणि यशस्वी मराठी युट्यूबर म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते. यात अलिकडेच तिने युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्याविषयी चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यामध्येच तिने बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार का? हे सांगितलं.

'तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव

अलिकडेच उर्मिलाने एका व्हिडीओमध्ये चाहत्यांच्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं दिली. यात बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाल्यास जाणार का?’ असा प्रश्न उर्मिलाला विचारण्यात आला. त्यावर उर्मिलाने तिला बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं सांगितलं.

काय म्हणाली उर्मिला?

"खरंतर मला 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. मला दुसऱ्या पर्वासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यांनी मला संधी दिली हे छान आहे. पण, मी अजिबात तिकडे जाऊ शकत नाही आणि, बिग बॉसचा प्रवास सुद्धा करु शकत नाही. इथे माझं सगळं बरं चाललं आहे. त्यामुळे मला बिग बॉसमध्ये जायची इच्छा नाही", असं उर्मिला म्हणाली.

दरम्यान, गेल्या काही काळापासून उर्मिला कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, युट्यूबवर तिने तिचं चांगलं स्थान निर्माण केलं आहे. युट्यूबवर लाइफस्टाइल, फॅशन, ट्रॅव्हल अशा अनेक विषयांवर ती व्हिडीओ करत असते. तसंच ती पॉडकास्टदेखील करते. उर्मिलाने ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमध्ये तर हिंदीमध्ये ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीउर्मिला निंबाळकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन