Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photo: स्वानंदीला लागली लॉटरी; नव्या मालिकेत झळकताच खरेदी केली लक्झरी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:16 IST

Swanandi tikekar: एकाच वेळी स्वानंदीला दोन लॉटरी लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे तिला नवीन मालिका मिळाली. तर, दुसरीकडे तिच्या दारात ब्रँड न्यू कार आली आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी'  या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. अभिनेता उदय टिकेकर यांची लेक असूनही स्वानंदीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या स्वानंदी  सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेनंतर तिला लॉटरी लागली आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी'मध्ये झळकलेली स्वानंदी सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी स्वानंदीला दोन लॉटरी लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे तिला नवीन मालिका मिळाली. तर, दुसरीकडे तिच्या दारात ब्रँड न्यू कार आली आहे. स्वानंदीने स्वकष्टातून नवीन गाडी खरेदी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या स्वानंदीने 'माय ब्यूटी माय बिस्ट', असं कॅप्शन देत तिच्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. स्वानंदीने  काळ्या रंगाची स्कोडा कार खरेदी केली आहे. नवीन गाडी घरात येताच स्वानंदीने तिच्यासोबत एक मस्त राईडही केली. याचेही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. स्वानंदीची ही पोस्ट पाहिल्यावर अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :स्वानंदी टिकेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन