Join us  

शिवानी सुर्वे बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ! फोटो शेअर करत म्हणाली, "तुझी गर्लफ्रेंड म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 1:17 PM

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अजिंक्य ननावरे शिवानी सुर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार, अभिनेत्री म्हणाली...

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच स्वानंदी टिकेकर, सोनल पवार या मराठी अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कौमुदी वलोकरनेही गुपचूप साखरपुडा उरकला. आता मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

शिवानी सुर्वे या वर्षात बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शिवानी सध्या अजिंक्यबरोबर पाँडिचेरीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने अजिंक्यबरोबरचा एक रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शिवानीने "तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोमुळे शिवानी आणि अजिंक्य लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

अजिंक्य ननावरेदेखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या अजिंक्य झी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. 'पावनखिंड', 'सोंग्या' या चित्रपटांत तो झळकला आहे. तर शिवानीनेही अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. 'देवयानी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवानीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तिने 'वाळवी', 'ट्रिपल सीट', 'सातारचा सलमान' या सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

टॅग्स :शिवानी सुर्वेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार