Join us

शनाया उर्फ रसिका सुनील गोव्याच्या किनारी अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:07 IST

रसिका सुनीलने सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील(Rasika Sunil)ने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. रसिका आणि आदित्यने नुकतेच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या दोघांचे लग्न १८ ऑक्टोबरला पार पडले. मात्र त्यांनी ३० ऑक्टोबरला त्यांच्या लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करून सांगितली आहे. 

रसिका सुनील आणि आदित्य बिलागीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, १८ ऑक्टोबर, २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

दोन वर्षांपूर्वी रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून लॉस अँजेलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची आदित्य बिलागीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १ जानेवारीला नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत रसिकाने तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले.

आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तो लॉस अँजेलिसमध्ये राहतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचेही अनेक फोटो पाहायला मिळतात. रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको