Join us
Daily Top 2Weekly Top 5

भव्य सेट, दमदार व्यक्तिरेखा अन् धारदार संवाद... प्रदर्शनाआधीच 'फुलवंती'ची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:31 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे.

Phulwanti Marathi Movie : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे. तिच्या 'फुलवंती' (Phulwanti Marathi Movie) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत आहेत. आपल्या मनमोहक अदाकारीने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या 'फुलवंती'ने अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आहे.  'फुलवंती'च्या भूमिकेत प्राजक्ता माळी आणि व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील गश्मीर महाजनी आहे. 

'फुलवंती'सिनेमाचा ट्रेलर, त्यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच प्राजक्ताचा लुकची आणि तिच्या लावणीची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. यासिनेमात मोठी स्टारकास्ट तर आहेच. शिवाय, या सिनेमात उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता यांचा सुंदर मिलाफ आहे. त्यामुळे ही कलाकृती रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

'फुलवंती' ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका असून ती कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यातील पेशवे दरबारात येते. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना 'फुलवंती' आणि प्रकांडपंडीत 'व्यंकट शास्त्री' यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

प्राजक्तासाठी हा चित्रपट खास आहे. कारण, ती या सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहेच, शिवाय या सिनेमाची ती निर्माती देखील आहे.  हा सिनेमा स्वतः प्राजक्ता माळीच्या प्रोडक्शन हाउसमध्ये तयार झाला आहे.  पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर 'फुलवंती' कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.  येत्या ११ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीमराठी अभिनेता