Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शिवा' मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली- "गेल्या दीड वर्षात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:35 IST

'या' लोकप्रिय अभिनेत्रीने शिवा मालिकेतून घेतली एक्झिट, कारण काय?

Shiva Serial: झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' (Shiva) ही मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्याचबरोबर  या मालिकेतील शिवा, आशू, सिताई आणि  रामभाऊ, दिव्या, चंदन, किर्ती ही पात्रे प्रेक्षकांना आपलीशी  वाटू लागली आहेत. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता  वाढत चालली आहे. त्यात आता या मालिकेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 'शिवा' मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याचं समजतं आहे. 

'शिवा' मालिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेचा टीआरपी सुद्धा चांगला असतो. त्यात आता मालिकेत सीताई भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "सीताई, ती माझ्यासारखी नाहीये पण, जसं ते म्हणतात, की त्या पात्राप्रमाणे तुम्ही बनता..., गेल्या दीड वर्षात असंच काहीसं घडलं. तो प्रत्येक क्षण मी जपून ठेवला आहे." 

त्यानंतर पुढे मीरा वेलणकर यांनी म्हटलंय, आता, कदाचित हीच माझ्या पुढील प्रवासाची योग्य वेळ असेल. "सीताई" मला तुझी नक्कीच आठवण येईल. पण, मी नवीन संधी, नवीन पात्र, नवीन भूमिका आणि नवीन सुरुवातीसाठी देखील तितकीच उत्सुक आहे. या सुंदर प्रवासासाठी मी पूर्णपणे आभारी आहे!" अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

मीरा वेलणकर यांनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्यांच्या मालिकेतील प्रवासाची झलक दाखवली आहे. दरम्यान, त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सहकलाकार शाल्व किंजवडेकर, पूर्वा कौशिक कमेंट्स करत भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी