Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोळे सुजलेले, चेहऱ्यावर जखमा अन्...; अभिनेत्री चिन्मयी सुमीतच्या कारचा अपघात, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:57 IST

सरकारच्या हिंदी भाषा सक्तीला अभिनेत्री चिन्मयी सुमीतने देखील कडाडून विरोध करत याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र त्याआधीच त्यांचा अपघात झाल्याने या मेळाव्याला आता त्यांना उपस्थित राहता येणार नाहीये. 

अभिनेत्री चिन्मयी सुमीत ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गाजत आहे. सरकारच्या या निर्णयाला सगळीकडूनच कडाडून विरोध होत आहे. आता त्रिभाषा सूत्राची ही सक्ती मागे घेतली आहे. समिती नेमून याबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकारच्या हिंदी भाषा सक्तीला अभिनेत्री चिन्मयी सुमीतने देखील कडाडून विरोध करत याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र त्याआधीच त्यांचा अपघात झाल्याने या मेळाव्याला आता त्यांना उपस्थित राहता येणार नाहीये. 

काही दिवसांपूर्वीच चिन्मयी सुमीतचा अपघात झाल्याचं अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे. या व्हिडिओत अभिनेत्रीचे डोळे सुजलेले दिसत असून तिच्या चेहऱ्यावरही जखमा आहेत. "नमस्कार मी चिन्मयी सुमीत, आज 29 जून, आपण गेले काही दिवस तिसरी भाषा हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करत आहोत. गेले अडिच महिने आम्ही रान पेटवलंय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.दोन दिवसांपूर्वी माझा एक अपघात घडला, त्यामुळे आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टरांनी मला परवानगी दिलेली नाही. मी तिथे जरी शरीरानं नसली तरी तमाम मराठी जनांना अत्यंत मी आवाहन करते की, या आंदोलनात आपली संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसू द्या", असं म्हणत तिने सगळ्यांना आवाहन केलं आहे. 

पुढे ती म्हणते, "पहिल्यांदा असं होतंय जेव्हा राजकीय पक्ष आणि नागरीक समजा कोणत्या तरी एका विषयावर एकत्र येऊन आदोलन उभं करत आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना माझे मनापासून धन्यवाद. मी आज तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला खूप मोठी खंत वाटते, पण मला विश्वास आहे की तुम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहाल आणि ते आंदोलन कराल. आपण एकत्र आलो आहोत. एकत्र संघर्ष करुयात, विजयी होऊया. जय भीम, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. जय मराठा".

टॅग्स :चिन्मयी सुमीतसेलिब्रिटी