Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पा २ मधील 'अंगारो से' गाण्याला मराठी टच, चैत्राली गुप्तेचं लेकीसोबत रील; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 11:46 IST

चैत्राली गुप्तेंच्या लेकीला पाहिलंय का?

अभिनेत्री चैत्राली गुप्ते (Chaitrali Gupte) बऱ्याच वर्षांपासून अभिनय मनोरंजनसृष्टीत सक्रीय आहेत. हिंदी मालिका, जाहिरातींमधून सध्या ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. शिवाय चैत्राली आणि त्यांची मुलगी शुभवी (Shubhavi Gupte) दोघीही सोशल मीडियावर चर्चेत असतात. शुभवी सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिला रील्स बनवायची आवड आहे. पुष्पा 2 मधील 'अंगारो से' या व्हायरल गाण्यावर मायलेकीने बनवलेलं रील व्हायरल होतंय.

चैत्राली गुप्ते या मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता लोकेश गुप्ते यांच्या त्या पत्नी आहेत. दोघांना शुभवी ही एकुलती एक मुलगी आहे. शुभवी तिच्या बाबांसोबत कॉमेडी रील्स बनवत असते  जे नेहमीच व्हायरल होतात. तर आईसोबत ती वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करते. पुष्पा 2 मधलं 'अंगारो से' गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. याच गाण्यावर मायलेकीने हे रील बनवलंय. लोकेश गुप्तेंनीच हे रील शूट केलंय. याला एक वेगळा टच देण्यात आला आहे. अंगारो से आणि मराठमोळं लाजरा अन् साजरा मुखडा या दोन गाण्यांचं फ्युजन बनवण्यात आलंय.

मायलेकीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही या जोडीचं कौतुक केलं आहे. चैत्राली आणि लोकेश गुप्ते यांच्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत. त्यांच्या जोडीचं मराठी प्रेक्षकांना नेहमीच कौतुक वाटतं. त्यांची लेक शुभवी गुप्तेही पुठे अभिनय क्षेत्रात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या ती मुंबईतील एका महाविद्यालयातच शिक्षण घेत आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासोशल मीडिया