Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी कायम सोबत आहे! अश्विनी महांगडेची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, म्हणते- आपल्या घरच्यांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:40 IST

काही महिन्यांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आता बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तिने खास पोस्ट लिहिली आहे.

अश्विनी महांगडे हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून अश्विनीने मराठी कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. तर अनेकदा वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे अपडेट्सही अश्विनी चाहत्यांबरोबर शेअर करते. 

काही महिन्यांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आता बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तिने खास पोस्ट लिहिली आहे. अश्विनीच्या बॉयफ्रेंडचं नाव निलेश जगदाळे असं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन त्याचा एक फोटो शेअर केला आहे. "बाबा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कायम एकत्र राहून आपण आपली सगळी स्वप्नं पूर्ण करू. आपल्यासाठी आपल्या घरच्यांनी जी स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते करूच. आयुष्याच्या या प्रवासात माणसं जोडत जा. मी आहे कायम सोबत," असं कॅप्शन अश्विनीने या फोटोला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या अश्विनीला 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने राणू अक्का ही भूमिका साकारली होती. सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते'मधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात अश्विनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकार