Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता नावाचं पात्र साकारुन ती घराघरात पोहोचली. सध्या अपूर्वा स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काम करताना दिसते आहे. नुकताच अपूर्वाने सोशल मीडियावरने 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितसोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. अलिकडेच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२५ पार पडला. यानिमित्ताने माधुरी दीक्षितसोबत तिने स्टेज शेअर केला. या अविस्मरणीय भेटीचा अनुभव सांगत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर शब्दांत पोस्ट शेअर केली आहे.
यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील हजेरी लावली. यानिमित्ताने अनेक कलाकारांची धकधक गर्ल ला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. याच भेटीचा किस्सा शेअर करत प्रेमाची गोष्ट मधील सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळते. दरम्यान, या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, हो, मी 'धकधक गर्ल'ला भेटले. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ मध्ये मला दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत स्टेज शेअर करण्याचा मान मिळाला आणि मी अजूनही तो सुंदर क्षण अनुभव करण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्यापासून काही फूट अंतरावर तिला समोर पाहणं हे कोणत्याही जादूसारखं होतं. तिचं सौंदर्य, प्रत्येक अदा इतकी मनमोहक होती की मी काही क्षणांसाठी स्वतला पूर्णपणे विसरुन गेले होते."
यानंतर पुढे अपूर्वीने लिहिलंय, "तिने अगदी सहजतेने केलेली हालचाल, तिचे प्रत्येक हावभाव, ती एक शाश्वत तारा आहे का? याची आठवण करून देत होता. त्याक्षणी जणू काही वेळ थांबला होता आणि मी माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न उलगडताना पाहत होते. आणि मग तो क्षण आला ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. ती आमच्यासोबत नाचली आणि मग एक पाऊल टाकले आम्हाला तिची नक्कल करावी लागली."
मला माझ्या कामाचा अभिमान
"तो क्षण पाहून मी भारावून गेले. मी लहानपणी तिला पाहत, तिची गाणी सादर करत मोठी झाले आहे, आणि आता, मी त्याच स्टेजवर तिच्यासोबत डान्स करत होते. हे असे क्षण आहेत जे मला असं वाटतं की मी खरोखरच आयुष्यात जिंकली आहे. या सुवर्ण संधीसाठी मी स्टार प्रवाहचे आभार मानू इच्छिते. एक अभिनेत्री असण्याचे हे फायदे आहेत, ज्या स्वप्नांची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल ती पूर्ण होतील असे स्वप्न जगणे. मला माझे काम खूप आवडते आणि आज मी जिथे आहे तिथे असण्याचा मला खूप आनंद आहे." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.