Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:58 IST

Anuja sathe: अभिज्ञा, रेश्मा आणि अनुजा यांनी हा व्हिडीओ शूट करताना काय मज्जा आली हेदेखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

कलाविश्वात फार मोजके असे कलाकार आहेत ज्यांची एकमेकांशी फार घनिष्ट मैत्री आहेत. त्यातलीच एक त्रिकडी म्हणजे अभिज्ञा भावे, रेश्मा शिंदे आणि अनुजा साठे. या तिघींची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा या एकमेकींसोबतचे भन्नाट फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळीदेखील अनुजाने असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर अनुजाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत येत आहे. या व्हिडीओमध्ये तिघींनीही शंकर महादेवन यांच्या 'उफ्फ तेरी अदा' या गाण्यावर रिल केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यातून तिघींमधील बॉडिंग दिसून येत आहे.

दरम्यान,अभिज्ञा, रेश्मा आणि अनुजा यांनी हा व्हिडीओ शूट करताना काय मज्जा आली हेदेखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. यापूर्वीही या तिघींनी असे भन्नाट व्हिडीओ, फोटो शेअर केले आहेत. 

टॅग्स :अभिज्ञा भावेअनुजा साठेरेश्मा शिंदेसेलिब्रिटीटेलिव्हिजन