Join us

अभिज्ञा भावेच्या Floral print बिकिनी फोटोशूटवर सेलिब्रिटीही क्लीन बोल्ड; कमेंटचा पडतोय पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:00 IST

Abhidnya bhave: अलिकडेच अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे.

मराठी कलाविश्वातली बोल्ड विथ ब्युटी अशी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे(abhidnya bhave). उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिज्ञा तिच्या हटके स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. कोणतीही नवीन फॅशन किंवा ट्रेंड ती अगदी सहजरित्या फॉलो करतो. विशेष म्हणजे केवळ फॉलोच करते असं नाही तर तो सुंदररित्या कॅरीही करते. यात अनेकदा ती तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यातूनच तिचा सोशल मीडियावरील वावर लक्षात येतो. अलिकडेच अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे यात ती बिकिनीमध्ये दिसून येत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या अभिज्ञाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची Floral print असलेली बिकिनी परिधान केली आहे. सोबतच एक छान स्माईल देत फोटोसाठी पोझ दिली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे.

दरम्यान, अभिज्ञाने 'तुला पाहते रे' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेव्यतिरिक्त ती अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये झळकली आहे.  २०१० साली ‘प्यार की ये एक कहानी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अलिकडेच तिची मुव्हिंग आऊट ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

टॅग्स :अभिज्ञा भावेसेलिब्रिटीसिनेमा