Join us

"मला जे सांगायच ते..." प्रियाच्या वाढदिवशी उमेशने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो,'Phone बाजूला ठेवला की...,' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 10:02 IST

अभिनेता उमेश कामतने बायको प्रिया बापटसाठी वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

Priya Bapat Birthday : अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने मराठी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघांचे एकत्र फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.दरम्यान, नुकतीच उमेशने सोशल मीडियावर प्रियाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नुकतीच उमेश कामतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. बायको प्रिया बापटच्या वाढदिवशी तिला हटके अंदाजात शुभेच्छा देत त्याने काही फोटो पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये प्रिया आणि उमेशचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे.

उमेशने सोशल मीडियावर प्रियासोबतचे फोटो शेअर करत त्यात लिहलंय, "प्रिया तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला तुझ्यासारखं योग्य शब्दात व्यक्त होता येत नसलं, अचूक शब्दात कौतुक करता येत नसलं तरी तुला माहित आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि मला तुझं किती कौतुक आहे.बाकी सगळं मला जे सांगायच ते मी हे पोस्ट करुन झाल्यावर फोन बाजूला ठेवला की बाजूलाच बसलेल्या तुल प्रत्यक्ष सांगेनच". असं म्हणत त्याने भलंमोठं कॅप्शन लिहलं आहे. 

दरम्यान, उमेशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे तसेच, अमृता खानविलकर यांनी प्रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया