Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : ह्याचं उत्तर आहे का कोणाकडे? स्वप्नील जोशी जोमात, चाहते कोमात...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 17:22 IST

Swapnil Joshi Reel : सध्या स्वप्नीलनं शेअर केलेलं एक रील्स तुफान व्हायरल होतंय. ‘ह्याचं उत्तर आहे का कोणाकडे?’ असा प्रश्न स्वप्नीलने या रील्समधून विचारला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी  (Swapnil Joshi) सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. स्वप्नील सतत मजेशीर व्हिडीओ शेअर करतो. त्याने शेअर केलेले भन्नाट रील्सही क्षणात व्हायरल होतात. सध्या स्वप्नीलनं शेअर केलेलं एक रील्स तुफान व्हायरल होतंय.‘ह्याचं उत्तर आहे का कोणाकडे?’ असा प्रश्न स्वप्नीलने या रील्समधून विचारला आहे. रील्स मजेशीर आहे, तेवढेच स्वप्नीलचे त्यातील एक्सप्रेशन्सही मजेशीर आहेत.

व्हिडीओत स्वप्नीलच्या मागून   ‘प्यार अगर अंधा है तो अभीतक मुझसे टकराया क्यूं नहीं?..’ असा एक आवाज येतो आणि हा प्रश्न ऐकून स्वप्नीलही विचारात पडतो.  त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.

‘तो जरूर प्यार बेवकूफ भी होगा,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘सर त्याला म्हनाव तुज्या अंगाचा सुगंध आला आणि त्याला कळाल ....’अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. ‘हो सकता हे वो लंगडा भी हो,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.  ‘आम्ही शोधून दमलो यार ..तुमच्याकडे असेल तर द्या उत्तर’, अशी कमेंट देत एका युजरने स्माईलीच्या इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

लवकरच स्वप्नील एका मालिकेत दिसणार आहे.‘तू तेव्हा तशी’ ही स्वप्नीलची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेत स्वप्नील आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेची सध्या सगळीकडे चर्चा आहे.  ही मालिका 30 मार्चपासून झी मराठीवर सुरू होत आहे.

 स्वप्नील जोशी चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जीवलगा’ ही त्याची शेवटची मालिका होती. स्वप्नील सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचा एक भाग आहे.  

टॅग्स :स्वप्निल जोशी